Pranali Kodre
ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धेत एकेरीसाठी भारताचा टेनिसपटू सुमीत नागल पात्र ठरला होता.
नागलने या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवत इतिहासही रचला. मात्र, दुसऱ्या फेरीत त्याला पराभवाचा धक्का बसला.
सुमीतला दुसऱ्या फेरीत चीनच्या 18 वर्षीय शँग ज्यूनचेंगने 6-2, 3-6, 5-7,4-6 अशा फरकाने चार सेटमध्ये पराभूत केले.
त्यामुळे सुमीतचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. पण असे असले तरी त्याला बक्षीस म्हणून मोठी रक्कम मिळाली आहे.
काही महिन्यांपूर्वीच आपल्या खात्यात 1 लाखाहून कमी रक्कम असल्याचे त्याने सांगितले होते. मात्र आपल्या खेळाने आता त्याने ऑस्ट्रेलियन ओपनमधून मोठे बक्षीस मिळवले आहे.
ऑस्ट्रेलियन ओपनच्या नियमानुसार दुसऱ्या फेरीतून बाहेर पडणाऱ्या खेळाडूला 180,000 ऑस्ट्रेलियन डॉलर (साधारण 98 लाख रुपये) बक्षीस मिळते.
सुमीतने या स्पर्धेत पहिल्या फेरीत 31 व्या मानांकित ऍलेक्झँडर बब्लिकविरुद्ध विजय मिळवला होता. त्यामुळे तो 1989 साला नंतरचा ग्रँडस्लॅम स्पर्धेत मानांकित खेळाडूविरुद्ध विजय मिळवणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला होता.