Sameer Amunekar
जिम थांबवल्यानंतर शरीर स्नायूंची ताकद आणि आकार गमवायला लागतो. त्यामुळे प्रोटीनयुक्त आहार सुरू ठेवा, शरीरवजनावर आधारित व्यायाम सुरू ठेवा.
शरीराची कॅलरी खपत कमी झाल्याने चरबी साठू लागते. त्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवा, जेवणात फायबर आणि कमी कॅलरी असलेले पदार्थ घ्या.
शरीराची ऊर्जा जाळण्याची गती कमी होते. त्यामुळे दररोज थोडा तरी चालणे, सीढ्या चढणे, स्ट्रेचिंग सुरू ठेवा.
जिममध्ये व्यायामामुळे निर्माण होणारे ‘एंडॉर्फिन’ थांबतात, मूड निगेटिव्ह होतो. त्यामुळे ध्यान, योगा, श्वासोच्छ्वासाचे व्यायाम करा.
शारीरिक हालचाल कमी झाल्याने झोप येण्याची प्रक्रिया विस्कळीत होते. त्यामुळे रात्री वेळेवर झोपणे, मोबाईलपासून दूर राहणे, साखरयुक्त पदार्थ टाळणे.
सक्रियता न राहिल्याने शरीर थकलेले आणि आळशी वाटते. त्यामुळे सकाळी सैर, थोडं नाचणं, किंवा हलक्या हालचाली सुरू ठेवा.
व्यायाम थांबवल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते. त्यामुळे भरपूर पाणी प्या, फळं आणि भाज्यांचा आहार वाढवा, स्ट्रेस टाळा.