Akshay Nirmale
सेबीने 2011 मध्ये सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशन लिमिटेड (SIREL) आणि सहारा हाऊसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (SHICL) यांना जमा रक्कम परत करण्याचा आदेश दिला.
सेबीने आदेशात म्हटले होते की, दोन्ही कंपन्यांनी नियमांचे उल्लंघन करून पैसे उभे केले.
दोन्ही कंपन्यांना गुंतवणूकदारांकडून जमा केलेले पैसे 15 टक्के व्याजासह परत करण्यास सुप्रीम कोर्टाने सांगितले होते.
यानंतर सहाराला गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी सेबीकडे अंदाजे 24,000 कोटी रुपये जमा करण्यास सांगण्यात आले.
सेबीने 11 वर्षात सहारा समूहाच्या दोन कंपन्यांतील गुंतवणूकदारांना 138.07 कोटी रुपये परत केले.
परतफेडीसाठी खास उघडलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आलेली रक्कम 25,000 कोटींहून अधिक झाली आहे.
SEBI ने सांगितले की 31 मार्च 2023 पर्यंत राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये जमा केलेली एकूण रक्कम सुमारे 25,163 कोटी रुपये आहे.