Sameer Amunekar
रोज एकाच वेळी अभ्यास करण्याची सवय लावा. यामुळे मेंदू त्या वेळेस अभ्यासासाठी सज्ज राहतो.
संपूर्ण पाठ अक्षरशः पाठांतर करण्याऐवजी महत्त्वाचे पॉईंट्स, कीवर्ड्स आणि डायग्राम वापरा. माईंड मॅप्स, फ्लॅशकार्ड्स आणि शॉर्ट नोट्स खूप मदत करू शकतात.
एकाच विषयाचा दीर्घ अभ्यास कंटाळवाणा होऊ शकतो. त्यामुळे १-२ तासांनी विषय बदलत जा. यामुळे अभ्यासात रुची टिकून राहते.
शांत, प्रकाशमान आणि व्यवस्थित जागेत अभ्यास करा. अंथरुणावर किंवा टीव्हीसमोर बसून अभ्यास केल्यास झोप येऊ शकते किंवा लक्ष विचलित होऊ शकतं.
क्विझ, ग्रुप डिस्कशन किंवा स्वतःला प्रश्न विचारून उत्तर देण्याचा सराव करा. यामुळे मजाही येते आणि अभ्यास चांगला लक्षात राहतो.
मेंदूला योग्य ऊर्जा मिळण्यासाठी संतुलित आहार आणि पुरेशी झोप आवश्यक आहे. झोप कमी झाली तर अभ्यासात लक्ष केंद्रित करणे कठीण होते.