Sameer Amunekar
मुलांना अभ्यासासाठी एक ठरलेला वेळ द्या. अभ्यासाची वेळ, खेळाची वेळ आणि विश्रांतीची वेळ यांचे संतुलन ठरवून दिल्यास ते अधिक लक्ष केंद्रित करू शकतात.
मुलांना जे विषय आवडतात, त्यात अधिक गुंतवून घ्या. उदाहरणार्थ, गणित किंवा विज्ञान अधिक आकर्षक बनवण्यासाठी प्रयोग किंवा खेळांचा वापर करा.
एकाच वेळी मोठं काम न करता, छोटे-छोटे लक्ष्य ठरवून त्यावर काम करा. हे मुलांना प्रगती दाखवते आणि त्यांना प्रोत्साहित करतं.
चांगला अभ्यास आणि प्रगतीसाठी पॉझिटिव्ह रिवॉर्ड्स देणं महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, त्यांना आवडलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी छोट्या बक्षिसांचा विचार करा.
मुलांना आकर्षित करण्यासाठी शैक्षणिक ॲप्स आणि ऑनलाइन रिसोर्सेसचा वापर करा.
नियमित विश्रांती, खेळ, योगा आणि ध्यान यांचा वापर मुलांचा मानसिक ताण कमी करण्यासाठी करा.