Sameer Amunekar
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात वसलेला लाडघर समुद्रकिनारा हा त्याच्या सौंदर्यासाठी आणि वैशिष्ट्यपूर्ण लालसर रेतीसाठी ओळखला जातो.
किनाऱ्यावरील वाळूला असलेल्या हलकासा लालसर रंग पर्यटकांचं विशेष लक्ष वेधून घेतो.
या समुद्रकिनाऱ्याला अनेकदा "लाल समुद्र" असंही संबोधलं जातं.
कोकणातील निसर्गसंपन्नतेचा अनुभव घेण्यास इच्छुक असलेल्या पर्यटकांसाठी लाडघर हे एक आकर्षणाचं केंद्र ठरत आहे.
शांत वातावरण, स्वच्छ किनारा आणि सुर्योदय व सूर्यास्ताचे भव्य दृश्य यामुळे लाडघरचा समुद्रकिनारा एक प्रसिध्द पर्यटनस्थळ आहे.
लाडघर हा समुद्रकिनारा दापोलीपासून सुमारे ८ किमी अंतरावर आहे.