Manish Jadhav
मुलांना अभ्यासाची सवय लावण्यासाठी दररोजची एक ठराविक वेळ निश्चित करा. यामुळे त्यांच्या मेंदूला त्या वेळेत एकाग्र होण्याची शिस्त लागते.
अभ्यासासाठी एक स्वतंत्र, हवेशीर आणि शांत जागा निवडा. जिथे टीव्ही किंवा मोबाईलचा आवाज नसेल, जेणेकरुन मुलांचे लक्ष विचलित होणार नाही.
लहान मुले जास्त वेळ एका जागी बसू शकत नाहीत. त्यांना दर 20-30 मिनिटांनी 5खेळातून शिक्षण द्या: मुलांना कंटाळवाण्या पाठांतरापेक्षा चित्रे, कोडी (Puzzles) आणि शैक्षणिक खेळांच्या माध्यमातून शिकवा. कल्पकतेने शिकवलेले मुलांच्या कायम लक्षात राहते. मिनिटांचा 'शॉर्ट ब्रेक' द्या. यामुळे त्यांचा मेंदू पुन्हा फ्रेश होतो.
मुलांना कंटाळवाण्या पाठांतरापेक्षा चित्रे, कोडी (Puzzles) आणि शैक्षणिक खेळांच्या माध्यमातून शिकवा. कल्पकतेने शिकवलेले मुलांच्या कायम लक्षात राहते.
मुलाने एखादे छोटेसे उत्तर बरोबर दिले किंवा होमवर्क पूर्ण केला, तर त्याचे कौतुक करा. यामुळे त्यांना अधिक अभ्यास करण्याची प्रेरणा मिळते.
केवळ शालेय पुस्तकेच नव्हे, तर गोष्टींची पुस्तके वाचायला द्या. यामुळे त्यांची शब्दसंपदा वाढते आणि वाचनात रुची निर्माण होते.
मुलांच्या मनात अनेक शंका असतात. त्यांना प्रश्न विचारण्यापासून रोखू नका. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिल्यास त्यांची जिज्ञासा आणि समज वाढते.
उत्तम एकाग्रतेसाठी मुलांना रात्री किमान 8-9 तासांची शांत झोप आणि सकस आहार मिळणे आवश्यक आहे. रिकाम्या पोटी किंवा थकलेल्या अवस्थेत मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही.