Manish Jadhav
कळंगुट बीचला त्याच्या अफाट विस्तारामुळे आणि सौंदर्यामुळे 'क्वीन ऑफ बीचेस' असे म्हटले जाते. हा उत्तर गोव्यातील सर्वात मोठा आणि लोकप्रिय समुद्रकिनारा आहे.
पॅरासेलिंग, जेट स्कीइंग, बनाना राईड आणि बंपर राईड यांसारख्या साहसी वॉटर स्पोर्ट्ससाठी कलंगुट हे पर्यटकांचे पहिले पसंतीचे ठिकाण आहे.
गोव्यात येणारा प्रत्येक पर्यटक एकदा तरी कलंगुटला भेट देतोच. वर्षभर येथे पर्यटकांची मोठी वर्दळ असते, विशेषतः डिसेंबर महिन्यात येथे पाय ठेवायलाही जागा नसते.
कलंगुटच्या रस्त्यांवर कपडे, हस्तकला वस्तू, दागिने आणि गोव्याचे खास सुविनियर्स मिळणारी अनेक दुकाने आहेत.
किनाऱ्यावर असलेल्या असंख्य 'बीच शॅक्स'मध्ये (Beach Shacks) गोवन पद्धतीचे मासे आणि इतर सी-फूडचा आस्वाद घेता येतो. येथील संगीत आणि जेवण पर्यटकांना मंत्रमुग्ध करते.
कळंगुट परिसरात अनेक प्रसिद्ध पब आणि डिस्कोथेक आहेत. रात्रीच्या वेळी हा भाग पूर्णपणे उजळून निघतो आणि संगीताच्या तालावर पर्यटक थिरकताना दिसतात.
कळंगुटपासून बागा बीच आणि कँडोलिम बीच अगदी जवळ आहेत. तसेच आग्वाद किल्ला आणि सेंट अलेक्स चर्च ही ऐतिहासिक ठिकाणेही काही अंतरावरच आहेत.
कळंगुटला भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ सर्वात उत्तम मानला जातो. या काळात हवामान आल्हाददायक असते आणि समुद्रही शांत असतो.