Akshata Chhatre
बाळ पोटात असताना व जन्मानंतरही सहा ते नऊ महिन्यांपर्यंत बालकाला आवश्यक असलेले कॅल्शिअम आईकडून मिळते. त्यानंतर मात्र ही गरज पोषक आहारातून भागवली जाणे गरजेचे असते.
बालकाचे वय एक ते तीन वर्षे असताना त्याला दरदिवशी 500 मिलिग्रॅम कॅल्शिअमची गरज असते व हे दोन कप दुधातून मिळू शकते.
बालकाचे वय 9 ते 18 वर्षे असताना त्याला दरदिवशी 1300 मिलिग्रॅम कॅल्शिअमची गरज असते व हे चार कप दुधातून मिळू शकते.
"डी' जीवनसत्त्वाच्या गोळ्या तर असतातच, परंतु नैसर्गिक प्रकारात हे सूर्याच्या किरणांच्या माध्यमातून त्वचेखाली तयार होते. त्यासाठी दररोज 15 ते 20 मिनिटे कोवळ्या उन्हात बसणे जरुरी आहे.
जर लहानपणीच चांगला आहार ठेवून हाडे बळकट बनवली तर मोठ्या वयात फ्रॅक्चर व हाडांच्या ठिसूळपणाचे प्रमाण कमी होऊ शकते.