Manish Jadhav
गोव्यात मित्रांसोबत एन्जॉय करण्याची वेगळीच मज्जा असते. गोव्याची खाद्यसंस्कृती खवय्यांमध्ये तितकीच प्रसिद्ध आहे.
एका साध्या ऑम्लेटला अनोखी चव देण्याची गोमन्तकीयांची कलाच वेगळी आहे. रॉस आम्लेट कांदे, टोमॅटो आणि मिरची टाकून तयार केले जाते. ते चिकन ग्रेव्ही बरोबर सर्व्ह केले जाते.
गोव्याच्या स्ट्रीट फूडपैकी एक प्रसिद्ध आईसक्रीम आहे. गोव्यात तुम्ही नक्की ट्राय केले पाहिजे.
तुम्ही पावभाजी खाल्ली असेलच. पण गोव्यातील पावभाजी तुम्हाला नक्की आवडेल. गोव्यातील टॉप स्ट्रीट फूडपैकी एक आहे.
गोव्यात तुम्हाला प्रत्येक स्ट्रीट फूड सेंटरवर शोरमा मिळतो. त्यात हलके मसालेदार मंद-शिजवलेले मांस आणि कुरकुरीत भाज्या ब्रेडमध्ये सर्व करतात.
गोव्यात तुम्ही फिश थाळी नक्की ट्राय केली पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारच्या फिश थाळी तुम्ही इथे ट्राय केल्या पाहिजेत.
नारळात मॅरीनेट केलेले टायगर आणि किंग प्रॉन्स आणि मसाल्यांचे मिश्रण करीमध्ये एकत्र करतात. तुम्हाला नक्की आवडेल.