Shadhdha Kapoor श्रद्धाने प्रियांकाला याबाबतीत टाकले मागे..

गोमन्तक डिजिटल टीम

प्रियांकाचा जलवा

अभिनेत्री प्रियांकाचा सोशल मिडियावरचा जलवा तिच्या फॅन्ससाठी नवा नाही. प्रियांका इन्स्टाग्रामवर सतत अॅक्टिव्ह असते.

प्रियांकाचे फॉलोअर्स

प्रियांकाचे इन्स्टावर 91.8 मिलीयन फॉलोअर्स आहे. पण देसी गर्लला स्त्री 2 फेम श्रद्धाने मागे टाकले आहे.

श्रद्धाचा प्रियांकाला धक्का

श्रध्दा कपूर “स्त्री 2” च्या बॉक्स ऑफिसवर यश मिळवत आहे. हा हॉरर-कॉमेडी ड्रामा विक्रम मोडत असताना, श्रद्धाने आता प्रियांकाला मागे टाकले आहे.

प्रियांका व्हर्सेस श्रद्धा

प्रियांका चोप्राचे इंस्टाग्रामवर 91.8 मिलीयन फॉलोअर्स आहेत तर गेल्या काही दिवसात श्रद्धाने 91.9 मिलियन फॉलोअर्स मिळवत आपली पॉप्युलिरिटी दाखवून दिली आहे.

दुसरी सर्वाधिक लोकप्रिय भारतीय

श्रद्धा कपूर इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केली जाणारी दुसरी भारतीय बनली आहे. देसी गर्ल प्रियांका चोप्राला मागे टाकून ती क्रिकेटर विराट कोहलीनंतर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली दुसरी सेलिब्रिटी बनली आहे.

2024 श्रद्धासाठी लकी

2024 हे वर्ष श्रद्धा कपूरसाठी खूप लकी ठरले आहे . 24 ऑगस्ट 2024 रोजी संध्याकाळी 4:32 पर्यंत, बॉलिवूडच्या देसी गर्लचे Instagram वर 91.8 मिलीयन फॉलोअर्स तर श्रद्धाचे आता 91.9 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत.

प्रियांकाला धक्का

या नव्या बातमीमुळे प्रियांकाची प्रतिक्रिया नेमकी काय आहे हे समजू शकले नसले तरी साहजिकच तिच्यासाठी हा धक्का आहे.

Bullet | Dainik Gomantak
पुणे टू गोवा यादगार सफर