गोमन्तक डिजिटल टीम
गोव्यामध्ये भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांवर भटक्या कुत्र्यांनी अनेक वेळा चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत.
पर्यटकांवर होणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या हल्यामुळे समुद्र किनारे असुरक्षित आहेत का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सध्या गोव्यात सूरु असलेल्या विधानसभेत भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नामुळे सर्वांचे लक्ष वेधले.
सरकारने गेल्याही वर्षी भटक्या संदर्भात धोरण करणार असल्याचे आश्वासन दिले होते. ते अजूनही अंमलात आलेले दिसत नाही.
भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी स्थानिकांनी वारंवार केली आहे.