Sameer Amunekar
चमकदार, मऊ आणि नैसर्गिक ग्लोइंग त्वचा हवी असेल तर स्ट्रॉबेरी फेस पॅक ठरू शकतो उत्तम पर्याय.
स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन C, अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक AHA असतात, जे त्वचेचा निस्तेजपणा कमी करण्यास मदत करतात.
2-3 पिकलेल्या स्ट्रॉबेरी मॅश करा. त्यात 1 चमचा मध आणि 1 चमचा दही मिसळून गुळगुळीत पेस्ट तयार करा.
स्वच्छ चेहऱ्यावर हा फेस पॅक लावा आणि 15-20 मिनिटे ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.
त्वचा हायड्रेट राहते, टॅनिंग कमी होण्यास मदत होते, डेड स्किन दूर होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो दिसू लागतो.
आठवड्यातून 2-3 वेळा हा फेस पॅक वापरल्यास त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होऊ शकते.
संवेदनशील त्वचा असल्यास आधी पॅच टेस्ट करा. कोणतीही अॅलर्जी किंवा त्वचेची समस्या असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.