Pranali Kodre
26 डिसेंबर 2023 रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सेंच्युरियनमध्ये आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघात मेलबर्नमध्ये कसोटी सामना सुरु झाला.
हे दोन्ही सामने बॉक्सिंग डे कसोटी म्हणून ओळखले जात आहेत. मात्र, त्यांना बॉक्सिंग डे कसोटी का म्हणतात हे जाणून घेऊ.
बॉक्सिंग डे कसोटी म्हणजे 26 डिसेंबरला म्हणजेच ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी खेळला जाणारा कसोटी सामना होय.
बॉक्सिंग डे बद्दल अनेक लोककथा प्रसिद्ध आहेत. असे म्हणतात की, राणी व्हिक्टोरियाच्या काळात राजघराण्यातील व्यक्तींकडून ख्रिसमसच्या भेटवस्तू दिल्या जायच्या. या भेटवस्तूंना 'ख्रिसमस बॉक्स' असे म्हणतात. तेव्हापासून २६ डिसेंबर हा दिवस 'बॉक्सिंग डे' म्हणून ओळखला जाऊ लागला.
तसेच असेही म्हटले जाते की नोकरदार वर्गाला या दिवशी बॉक्समधून भेटवस्तू दिल्या जातात, तसेच अनेकजण आपल्या मित्र-मैत्रीणी, नातेवाईकांनाही भेट देतात. म्हणून या दिवसाला बॉक्सिंग डे असे म्हटले जातात.
तसेच अशीही कथा आहे की चर्चमधील दान पेटी 26 डिसेंबर रोजी उघडली जाते आणि त्यातून गरजूंना मदत केली जाते. त्यामुळेही या दिवसाला बॉक्सिंग डे असे म्हटले जाते.
दरम्यान, 26 डिसेंबर रोजी सुरू होणाऱ्या कसोटी सामन्याला मोठा इतिहास देखील आहे.
जोहान्सबर्ग येथे 1913 साली दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यात 26 डिसेंबर रोजी कसोटी सामना सुरू झाला होता. सध्या माहित असलेल्या क्रिकेट इतिहासानुसार हा पहिला बॉक्सिंग डे कसोटी सामना म्हणून ओळखला जातो.
बॉक्सिंग डे कसोटी सामने ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये नियमितपणे खेळले जातात.
भारताने बॉक्सिंग डेच्या दरम्यान विविध स्टेडियमवर 1980 नंतर 21 कसोटी सामने खेळले आहेत.