Sameer Panditrao
पाण्याचा साठा करतो, पण ते किती दिवस वापरायचे हे तुम्हाला ठाऊक आहे का?
घरात साठवलेले पाणी काही दिवसांनंतर जीवाणू, शेवाळ आणि अशुद्ध घटकांनी दूषित होते.
विशेषतः बंद डब्यात ठेवलेले पाणी ऑक्सिजनअभावी लवकर खराब होते.
स्वच्छ झाकण असलेल्या डब्यात ठेवलेले पाणी जास्तीत जास्त २४ ते ४८ तासांपर्यंत सुरक्षित. त्यानंतर त्या पाण्यात गंध, रंग, आणि चव बदलू शकतात.
अंघोळ, कपडे धुणे, स्वच्छतेसाठी ठेवलेले पाणी २–३ दिवस वापरले जाऊ शकते.
तरीही दर ३ दिवसांनी पाणी बदलणे आवश्यक आहे, कारण कीटक आणि डासांची वाढ होते.
जुने पाणी वापरल्यास होऊ शकतात: पोटाचे विकार, त्वचारोग, डेंग्यू - मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका
पाण्याचा भांडे दर २ दिवसांनी धुवा, झाकण लावून ठेवा, थेट सूर्यप्रकाशापासून वाचवा, उकळून किंवा फिल्टर केलेले पाणीच साठवा
पाणी हा जीवनाचा स्रोत आहे. दर दोन दिवसांनी पाणी बदला आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य जपा.