Sameer Amunekar
नारळ तेल + एरंडेल तेल + भृंगराज तेल मिसळून हलक्या हाताने टाळूची मालिश करा. यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि केसांची मुळे मजबूत होतात.
सल्फेट-फ्री, केमिकल-फ्री शॅम्पू वापरा. आठवड्यातून जास्तीत जास्त 2 वेळाच केस धुवा; वारंवार धुण्याने केस कोरडे व कमकुवत होतात.
प्रथिने, आयर्न, बायोटिन आणि ओमेगा-3 भरपूर असलेला आहार घ्या. डाळी, अंडी, हिरव्या पालेभाज्या, ड्रायफ्रूट्स केसांच्या वाढीस मदत करतात.
आठवड्यातून एकदा दही + आवळा पावडर + अॅलोव्हेरा जेल यांचा मास्क लावा. यामुळे केसांना पोषण मिळते व तुटणे कमी होते.
हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, कर्लरचा अति वापर टाळा. गरज असल्यास लो-हीट सेटिंग वापरा.
सततचा ताण केस गळती वाढवतो. योग, ध्यान करा आणि रोज किमान 7–8 तासांची झोप घ्या.
घट्ट वेणी, पोनीटेल यामुळे केसांच्या मुळांवर ताण येतो. सैल हेअरस्टाइल ठेवा आणि ओले केस कधीही जोरात विंचू नका.