Akshata Chhatre
जास्त मीठ किंवा साखर खाल्ल्याने शरीरात इन्सुलिन वाढते, ज्यामुळे केस पातळ होऊन गळू लागतात.
मैदा, पांढरा ब्रेड आणि पास्ता यांमुळे हार्मोनल असंतुलन निर्माण होते, जे अकाली टक्कल पडण्यास कारणीभूत ठरू शकते.
शुगर-फ्रीच्या नावाखाली वापरले जाणारे आर्टिफिशियल स्वीटनर्स केसांच्या फॉलिकल्सना खोलवर नुकसान पोहोचवतात.
दारूमुळे शरीरातील झिंकची पातळी कमी होते आणि केसांमधील ओलावा निघून गेल्याने ते बेजान होऊन तुटतात.
जास्त चहा किंवा कॉफी प्यायल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्वे शोषून घेता येत नाहीत, ज्यामुळे केसांची वाढ खुंटते.
अंडी, डाळी (प्रोटीन), पालक (लोह) आणि अक्रोड (ओमेगा-३) यांचा आहारात समावेश केल्याने केस मुळापासून मजबूत होतात.
चुकीच्या सवयी सोडा आणि सकस आहाराला प्राधान्य द्या. तुमचे केस हे तुमच्या आंतरिक आरोग्याचे प्रतिबिंब आहेत.