Manish Jadhav
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रतिष्ठेची ॲशेस मालिका 21 नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरु होत आहे, जिथे दोन्ही संघात जबरदस्त टक्कर होण्याची अपेक्षा आहे.
ॲशेसमध्ये स्टीव्ह स्मिथचा रेकॉर्ड शानदार आहे. त्याने आतापर्यंत 37 कसोटी सामन्यांच्या 66 डावांमध्ये 56.01 च्या सरासरीने 3417 धावा केल्या आहेत.
या मालिकेदरम्यान स्टीव्ह स्मिथच्या निशाण्यावर 95 वर्षांपूर्वीचा एक मोठा विक्रम आहे.
स्मिथला ॲशेसच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचण्यासाठी केवळ 220 धावांची आवश्यकता आहे.
जर स्मिथने पर्थ येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात 220 धावा केल्या, तर तो इंग्लंडचे महान फलंदाज जॅक हॉब्स यांना मागे टाकेल.
हॉब्सनने 1908 ते 1930 दरम्यान 41 कसोटी सामन्यांमध्ये 3636 धावा करुन 95 वर्षांपासून दुसऱ्या क्रमांकाचे स्थान टिकवून ठेवले आहे.
जरी स्मिथ पहिल्या कसोटीत हा विक्रम करु शकला नाही, तरीही 5 कसोटी सामन्यांच्या या मालिकेत त्याला हा खास मुक्काम सहज गाठता येईल.
ॲशेसच्या इतिहासात सर्वाधिक 5028 धावांचा विक्रम अजूनही ऑस्ट्रेलियन दिग्गज सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे.