Ruturaj Gaikwad: ऋतुराजचा फॉर्म 'अल्ट्रा प्रो मॅक्स'! लिस्ट-ए क्रिकेटमध्ये रचला नवा इतिहास

Manish Jadhav

ऋतुराज गायकवाड

टीम इंडिया सध्या खराब फॉर्ममध्ये असताना, ऋतुराज गायकवाड सातत्याने मोठी खेळी करत आहे आणि उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.

Ruturaj Gaikwad | Dainik Gomantak

लिस्ट-ए मधील विक्रम

ऋतुराज गायकवाडने 'लिस्ट-ए' क्रिकेटमध्ये (वनडे फॉरमॅट) माजी कसोटीपटू चेतेश्वर पुजाराला मागे टाकले.

Ruturaj Gaikwad | Dainik Gomantak

उत्कृष्ट फलंदाजी

दक्षिण आफ्रिका-ए विरुद्धच्या सामन्यापूर्वी ऋतुराजची लिस्ट-ए क्रिकेटमधील सरासरी 59.93 होती, ती दुसऱ्या सामन्यानंतर वाढून 57.80 झाली आहे.

Ruturaj Gaikwad | Dainik Gomantak

दमदार कामगिरी

इंडिया-ए कडून खेळताना ऋतुराजने दक्षिण आफ्रिका-ए विरुद्ध एका सामन्यात 117 धावांची शतकी खेळी केली होती.

Ruturaj Gaikwad | Dainik Gomantak

अजिंक्य 68 धावा

शतकानंतरच्या दुसऱ्या सामन्यातही त्याने नाबाद खेळत 68 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली, ज्यामुळे त्याच्या फलंदाजी सरासरीला मोठा फायदा झाला.

Ruturaj Gaikwad | Dainik Gomantak

सीनिअर टीममध्ये संधी नाही

सातत्याने जबरदस्त कामगिरी करुनही गेल्या अनेक वर्षांपासून त्याची भारतीय सीनिअर संघात अद्याप पूर्णवेळ आणि नियमित पुनरागमन झालेले नाही.

Ruturaj Gaikwad | Dainik Gomantak

आंतरराष्ट्रीय अनुभव

ऋतुराजने भारतासाठी आतापर्यंत 6 एकदिवसीय (ODI) आणि 23 टी20 आंतरराष्ट्रीय (T20I) सामने खेळले आहेत, पण त्याला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळालेली नाही.

Ruturaj Gaikwad | Dainik Gomantak

निवड समितीचे दुर्लक्ष

'इंडिया-ए' कडून खेळताना त्याने धावांचा पाऊस पाडला असतानाही, निवड समितीचे अजूनही त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात आहे.

Ruturaj Gaikwad | Dainik Gomantak

Kuldeep Yadav: कुलदीप यादवचा धमाका, घरच्या मैदानावर अशी कामगिरी करणारा ठरला तिसरा डावखुरा गोलंदाज!

आणखी बघा