Manish Jadhav
एशेज मालिकेतील चौथ्या कसोटीत इंग्लंडच्या फलंदाजांनी निराशा केली. ऑस्ट्रेलियाच्या 152 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 110 धावांवर आटोपला.
या सामन्यात स्टीव्ह स्मिथने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत जॅक क्राउली आणि बेन स्टोक्स यांचे दोन महत्त्वाचे झेल (Catch) टिपले. यासह त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्मिथ आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने भारताचे महान खेळाडू राहुल द्रविड (210कॅच) यांचा विक्रम मोडीत काढला. स्मिथच्या नावे आता 212 कॅच आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेण्याचा जागतिक विक्रम इंग्लंडच्या जो रुटच्या नावावर आहे. रुटने आतापर्यंत 214 झेल टिपले असून स्मिथ आता त्याच्या अगदी जवळ पोहोचला.
स्मिथ केवळ चांगला क्षेत्ररक्षकच नाही, तर जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याने 122 कसोटी सामन्यात 10,589 धावा केल्या असून यात 36 शतके आणि 44 अर्धशतकांचा समावेश आहे.
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 152 धावा केल्या होत्या, ज्यात उस्मान ख्वाजाच्या सर्वाधिक 29 धावा होत्या. इंग्लंडला 110 धावांत रोखल्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 42 धावांची महत्त्वाची आघाडी मिळाली आहे.
इंग्लंडच्या जोस टंगने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 5 बळी घेत शानदार कामगिरी केली, मात्र फलंदाजांनी साथ न दिल्याने इंग्लंडची स्थिती बिकट झाली.
2010 मध्ये पदार्पण केल्यापासून स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियन संघाचा मुख्य कणा राहिला आहे. क्षेत्ररक्षण असो वा फलंदाजी, प्रत्येक विभागात त्याने आपले वर्चस्व सिद्ध केले.