Steve Smith: लॉड्सवर होणार धमाका! स्मिथ मोडणार डॉन ब्रॅडमन अन् गॅरी सोबर्सचा रेकॉर्ड?

Manish Jadhav

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका

11 जूनपासून इंग्लंडमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका आमने-सामने येणार आहेत.

Steve Smith | Dainik Gomantak

स्टीव्ह स्मिथ

दरम्यान, लॉड्सवर खेळवण्यात येणाऱ्या कसोटी सामन्यात अनेक दिग्गज खेळाडू दिसतील, परंतु सर्वांच्या नजरा ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथवर असतील.

Steve Smith | Dainik Gomantak

इतिहास रचणार

स्टीव्ह स्मिथने यावर्षी जानेवारीमध्ये श्रीलंका दौऱ्यावर कसोटीत 10 हजार धावा पूर्ण करण्याचा महान पराक्रम केला होता. आता लॉर्ड्स येथे होणाऱ्या जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याच्याकडे नवा इतिहास रचण्याची उत्तम संधी असेल.

Steve Smith | Dainik Gomantak

महान खेळाडूंचा रेकॉर्ड धोक्यात

स्टीव्ह स्मिथ लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू गॅरी सोबर्स यांचा मोठा रेकॉर्ड मोडू शकतो. यासाठी त्याला फक्त एका अर्धशतकाची आवश्यकता आहे.

Steve Smith | Dainik Gomantak

40 धावांची गरज

जर स्मिथने 40 धावा केल्या तर तो लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा डॉन ब्रॅडमनचा रेकॉर्ड मोडेल.

Steve Smith | Dainik Gomantak

शानदार रेकॉर्ड

क्रिकेटच मक्का समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्समध्ये स्मिथने 4 कसोटी सामन्यांच्या 7 डावात 73.14 च्या प्रभावी सरासरीने 512 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 2 शतके आणि 2 अर्धशतके आहेत. डॉन ब्रॅडमनने या मैदानावर 551 धावा केल्या आहेत.

Steve Smith | Dainik Gomantak

सर्वाधिक धावा

जर स्मिथने 60 धावांचा टप्पा गाठला तर तो लॉर्ड्सवर सर्वाधिक कसोटी धावा करणारा पाहुणा फलंदाज बनेल. सध्या हा रेकॉर्ड गॅरी सोबर्सच्या नावावर आहे. गॅरी सोबर्सने लॉर्ड्सवर 5 कसोटी सामन्यांच्या 9 डावात 571 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने 2 शतके आणि 2 अर्धशतके ठोकली होती.

Steve Smith | Dainik Gomantak
आणखी बघा