Manish Jadhav
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मधील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांचा शेवटचा सामना 3 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे.
ऑस्ट्रेलियाने मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या या मालिकेतील चौथा सामना 184 धावांनी जिंकून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाला सिडनी कसोटी जिंकून मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधण्याची संधी आहे.
या मालिकेत आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या दोन फलंदाजांची कामगिरी चांगली झाली आहे, एक नाव ट्रॅव्हिस हेडचे आहे तर दुसरे नाव स्टीव्ह स्मिथचे आहे, ज्यामध्ये या दोन्ही फलंदाजांनी 2-2 शतके झळकावली.
नव्या वर्षात (2025) सिडनी येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यातही स्मिथला मोठी कामगिरी करण्याची संधी असेल.
आत्तापर्यंत, कसोटी क्रिकेटमध्ये 113 सामने खेळल्यानंतर, स्टीव्ह स्मिथने 202 डावांमध्ये 56.28 च्या सरासरीने 9962 धावा केल्या आहेत, त्यामुळे सिडनी कसोटी सामन्यात त्याने आणखी 38 धावा केल्या तर तो कसोटी क्रिकेटमधील त्याच्या 10000 धावा पूर्ण करेल.
अशा परिस्थितीत स्मिथकडे राहुल द्रविडचा विक्रम मोडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद दहा हजार धावांचा आकडा गाठणारा 5वा फलंदाज बनण्याची मोठी संधी आहे.