Manish Jadhav
स्टीव्ह स्मिथला कसोटी क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक का मानले जाते, याची झलक मेलबर्न कसोटीत पाहायला मिळाली.
ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गज फलंदाजाने मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात शानदार शतक झळकावले. ब्रिस्बेनमध्ये शतक झळकावणाऱ्या स्मिथने मेलबर्नमध्ये आपला फॉर्म कायम ठेवत अप्रतिम शतक झळकावले.
या शतकासह स्टीव्ह स्मिथने 6 दिग्गजांना मागे सोडले. स्मिथचे हे 34 वे कसोटी शतक असून त्याने आता सर्वाधिक कसोटी शतकांच्या बाबतीत केन विल्यमसन आणि ॲलिस्टर कुक यांना मागे टाकले आहे.
स्मिथने कमी कसोटी सामन्यांमध्ये 34 कसोटी शतकांचा आकडा गाठला.
मेलबर्न कसोटीत शतक झळकावणं स्टीव्ह स्मिथसाठी फारसं अवघड नव्हतं. मेलबर्नची खेळपट्टी मालिकेतील आतापर्यंतच्या सर्वात सोप्या खेळपट्ट्यांपैकी एक असल्याचे दिसून आले.
स्टीव्ह स्मिथचे हे शतक खास आहे कारण तो भारताविरुद्ध कसोटीत सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे. स्मिथने भारताविरुद्ध 11 शतके झळकावली आहेत.
तो भारताविरुद्ध 10 कसोटी शतके झळकावणाऱ्या जो रुटच्या पुढे गेला आहे. विशेष म्हणजे स्मिथने भारताविरुद्ध केवळ 43 डावांत 11 कसोटी शतके झळकावली आहेत. स्मिथने भारताविरुद्धच्या रेड बॉल कसोटीच्या पहिल्या डावात 10 पैकी 7 डावात शतके झळकावली आहेत.