Manish Jadhav
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील दुसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात सुरु झाला आहे. हा कसोटी सामना पिंक बॉलने खेळला जात असून टीम इंडियाच्या धाकडनं पहिल्याच दिवशी शानदार कामगिरी केली.
ऑस्ट्रेलियात टीम इंडिया पहिल्याच दिवशी ढेपाळली. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताला 180 धावांपर्यंत मजल मारता आली. याचदरम्यान जसप्रीत बुमराहने अर्धशतकी कामगिरी केली.
जसप्रीत बुमराहने उस्मान ख्वाजाची विकेट घेत अर्धशतक साजरं केलं. अशी कामगिरी करणारा तो भारताचा तिसरा वेगवान गोलंदाज ठरला.
जसप्रीत बुमराह एका वर्षात 50हून अधिक विकेट घेणारा भारताचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. या यादीत भारताचे माजी कर्णधार कपिल देव आघाडीवर आहेत. तर झहीर खान दुसऱ्या स्थानावर आहे.
जसप्रीत बुमराहने पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 5, तर दुसऱ्या डावात 3 विकेट घेतल्या होत्या.
दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहच्या नावावर एक विकेट आली आहे. यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.