Manish Jadhav
सध्या कडाक्याच्या उन्हामुळे देशातील बहुतांश भागात कमाल तापमानात वाढ झाल्याचे दिसत आहे. वाढत्या उष्म्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
उन्हाळा सुरु होताच शरीरातील उष्णता देखील वाढते, थकवा जाणवतो आणि सतत पाण्याची कमतरता भासते.
उन्हाळ्यात त्वचेच्या समस्येसह पचनासंबंधी त्रास होऊ लागतो. आशा वेळी भरपूर पाणी पिणे आणि लाइट खाणे योग्य असते.
उन्हाळ्यात आरोग्यासाठी काळे छोटे चिया सीड्स फायदेशीर ठरतात. आज (5 मार्च) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून उन्हाळ्यात चिया सिड्सचे सेवन किती गरजेचे आहे याबाबत जाणून घेणार आहोत.
उन्हाळ्यातील सुपरफूडपैकी एक सुपरफूड म्हणजे चिया सीड्स वॉटर.
वाढत्या उन्हामुळे चिया सीड्स वॉटर हे शरीरासाठी एक नैसर्गिक आणि आरोग्यदायी ड्रींक ठरु शकते.
चिया सीड्समध्ये ओमेगा-3, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्स असतात, जे उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवतात.
उन्हाळ्यात चिया सीड्स वॉटर नियमित प्यायल्यास शरीराचे तापमान नियंत्रित राहते आणि उष्णतेपासून संरक्षण होते.