Manish Jadhav
तुम्ही चेहऱ्यावर लिंबू लावत असाल तर ही वेबस्टोरी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
आज (4 मार्च) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून लिंबाच्या तोट्यांबद्दल जाणून घेणार आहोत.
लिंबामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, त्यामुळे त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी लिंबू प्रभावी ठरते. परंतु लिंबू चेहऱ्यावर लावताना सावधगिरी बाळगली पाहिजे.
लिंबू थेट चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवर पुरळ उठू शकते, त्वचेवर खाज सुटणे, चिडचिड होणे, लालसरपणा यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
ज्या लोकांची त्वचा संवेदनशील आहे त्यांनी थेट त्वचेवर लिंबू लावणे टाळावे, अन्यथा त्वचेवर सूज, लालसरपणा तसेच पुरळ येऊ शकते.
लिंबू खूप आम्लयुक्त असते आणि यामुळे जेव्हा आपण ते थेट त्वचेवर लावतो तेव्हा पीएच संतुलन बिघडते.