Manish Jadhav
गोव्यासह देशातील अनेक राज्यांमध्ये मॉन्सूनचे आगमन झाले आहे.
पावसाळ्यात कीटक, डास आणि जंतूंचे प्रमाण झपाट्याने वाढते. त्यामुळे पावसाळ्यात संसर्गचा धोका वाढतो. पावसाळ्यात आरोग्याबरोबर आहाराची देखील काळजी घ्यावी लागते.
आज (13 जून) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून कोणत्या खाद्यापदार्थांचे सेवन टाळावे याविषयी जाणून घेणार आहोत...
पावसाळ्यात मासे खाणे टाळावे. या ऋतूत बॅक्टेरिया आणि विषाणू वेगाने वाढतात, विशेषतः ओल्या जागी. त्यामुळे ते खाल्ल्याने संसर्गाचा धोका वाढतो.
पावसाळ्यात पचनक्रिया मंदावते, त्यामुळे मसालेदार आणि तळलेले अन्न पचण्यास कठीण होते. भजी, समोसे, चिप्स आणि इतर तळलेले पदार्थ खाणे टाळावे.
पावसाळ्यात पालक, मेथी, मोहरी इत्यादी हिरव्या भाज्यांमध्ये कीटक आणि बॅक्टेरिया वाढण्याचा धोका जास्त असतो.
कापलेली फळे बाजारात किंवा रस्त्यावरील विक्रेत्यांकडे बराच काळ ठेवली जातात, ज्यामुळे त्यामध्ये बॅक्टेरिया आणि बुरशीचा धोका वाढतो.