Sameer Panditrao
डॉक्टरी हे एक आव्हानात्मक क्षेत्र आहे.
या क्षेत्रात शिक्षण कालावधी प्रदीर्घ आहे. आणि स्पर्धाही बरीच आहे.
मेडिकल शिक्षणासाठी लाखो रुपयांचे कर्ज काढावे लागते. डॉक्टरांची सुरुवातीची वर्षे कर्ज फेडण्यातच जातात.
12-18 तास काम, नाईट ड्युटी, इमर्जन्सी कॉल्स — यामुळे डॉकटर मंडळींत झोपेचा अभाव अनुषंगाने मानसिक थकवा वाढतो.
अत्यंत व्यस्त वेळापत्रकामुळे कुटुंबाला वेळ देता येत नाही. वैवाहिक आयुष्य किंवा नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो.
दवाखान्यात हिंसक प्रकार वाढत आहेत. मारहाण, दमदाटीमुळे डॉक्टरांच्या आयुष्यात असुरक्षितता वाढत आहे.
“डॉक्टर म्हणजे देव” अशी अपेक्षा असते,. ही सामाजिक अपेक्षा तणाव वाढवते