Chhatrapati Shivaji Maharaj: शिवरायांच्या स्वराज्यात स्त्रिया किती सुरक्षित होत्या? जाणून घ्या शिवशाहीतील 'हे' 8 नियम

Manish Jadhav

'परस्त्री मातेसमान' हेच ब्रीद

महाराजांनी स्वराज्यात 'परस्त्री मातेसमान' हा संस्कार रुजवला. शत्रूच्या स्त्रीलाही सन्मानाने वागवण्याचे कडक आदेश त्यांनी दिले होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा प्रसंग जिचा महाराजांनी साडी-चोळी देऊन सत्कार केला आणि सन्मानाने परत पाठवले.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

कडक कायदे आणि न्यायव्यवस्था

स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांसाठी शिवकाळात अतिशय कठोर कायदे होते. रांझाच्या पाटलाने एका स्त्रीचा विनयभंग केला असता, महाराजांनी त्याचे 'चौरंग' (हात-पाय तोडणे) करण्याचे आदेश दिले होते. यावरुन स्त्रियांच्या सुरक्षेबाबत महाराज किती संवेदनशील होते हे स्पष्ट होते.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

जिजाऊंची दूरदृष्टी

राजमाता जिजाऊ या केवळ महाराजांच्या आई नव्हत्या, तर स्वराज्याच्या मार्गदर्शक होत्या. शिवरायांच्या अनुपस्थितीत त्या राज्याचा कारभार आणि न्यायनिवाडा समर्थपणे सांभाळत असत. त्या काळातील स्त्रियांच्या राजकीय आणि प्रशासकीय सहभागाचे त्या एक उत्तम उदाहरण आहेत.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

लष्करी आचारसंहिता

महाराजांनी लष्करासाठी कडक नियम बनवले होते. मोहिमेवर जाताना सैन्यात स्त्रियांना किंवा कलावंतीणींना नेण्यास सक्त मनाई होती. सैनिकांकडून कोणत्याही स्त्रीचे नुकसान होऊ नये, हा त्यामागचा मुख्य उद्देश होता.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

धार्मिक स्वातंत्र्य आणि आदर

स्वराज्यात केवळ हिंदूच नव्हे, तर मुस्लिम आणि इतर धर्मांच्या स्त्रियांनाही पूर्ण संरक्षण होते. शत्रूच्या धर्माची प्रार्थनास्थळे आणि तिथल्या स्त्रियांना धक्का लागणार नाही, याची खबरदारी महाराज जातीने घेत असत.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

सती प्रथेला विरोध

त्या काळात सती प्रथा प्रचलित होती, मात्र महाराजांनी या प्रथेला प्रोत्साहन दिले नाही. त्यांच्या निधनानंतर पुतळाबाई सती गेल्या, पण त्यांच्या इतर राण्या सती गेल्या नव्हत्या. महाराजांनी स्त्रियांना जीवन जगण्याचा आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याचा अधिकार दिला होता.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

कुटुंबातील अधिकार आणि सन्मान

शिवकाळात स्त्रिया कुटुंबाच्या केंद्रस्थानी होत्या. शेती आणि घरगुती व्यवसायात स्त्रियांचा मोठा सहभाग असे. युद्धाच्या काळात जेव्हा पुरुष सीमेवर असत, तेव्हा घर आणि शेतीची पूर्ण धुरा स्त्रियाच अत्यंत जिद्दीने सांभाळत असत.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

वारसा हक्क आणि मालमत्ता

मराठा साम्राज्यात स्त्रियांच्या नावावर जमिनीचे व्यवहार किंवा दाने दिल्याची अनेक उदाहरणे आढळतात. स्त्रियांना स्वतःची मालमत्ता राखण्याचा आणि कायदेशीर व्यवहारात सहभागी होण्याचा अधिकार त्या काळी मर्यादित स्वरुपात का असेना पण अस्तित्वात होता.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

Fort History: दक्षिण सीमेचा 800 वर्षे जुना रक्षक अन् शिवरायांच्या संघर्षाचा साक्षीदार

आणखी बघा