गोव्यात 'ट्रॅक' ठेवणार अपघात आणि वाहतूक कोंडीवर लक्ष

गोमन्तक डिजिटल टीम

वाहतूक कोंडी आणि अपघात

गोवा राज्यात वाढणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक विभागातर्फे ट्रॅक हे केंद्र स्थापन केले आहे.

गुगल मॅप आणि ड्रोन

ट्रॅक केंद्रातील काम गुगल मॅप आणि ड्रोनच्या मदतीने चालणार आहे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

या ट्रॅक केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

२४ तास सुरु

ट्रॅक केंद्रात २४ तास पोलीस कर्मचारी तैनात असतील.

गुगल मॅपद्वारे माहिती

गुगल मॅपद्वारे वाहतूक कोंडी दिसल्यावर भागातील पोलीस निरीक्षकाला ट्रॅक केंद्रातून माहिती मिळेल.

त्वरित दखल

अपघात अथवा वाहतूक कोंडीचे फोटो व्हिडिओ पाहून संबंधित यंत्रणा या गोष्टीची दखल घेईल.

नोंद ठेवणार

हे ट्रॅक सेंटर करण्यात आलेल्या कारवाईची आणि वेळेची नोंदही ठेवणार आहे.

आणखी पाहा