गोमन्तक डिजिटल टीम
४ जून रोजी गोवा राज्यात मॉन्सूनला सुरवात झाल्यापासून आतापर्यंत त्याने नवनवे विक्रम रचलेले आहेत.
आतापर्यंत एकूण ३८११.८ मिमी म्हणजेच तब्बल १५०.७० इंच इतक्या पावसाची नोंद करण्यात आली.
सर्वसामान्यपणे राज्यात संपूर्ण मॉन्सूनमध्ये १२० इंच पाऊस झाला की, सरासरी पावसाची पातळी गाठली असे समजले जाते
सरासरी पावसाच्या तुलनेत आतापर्यंत तब्बल ४५.८ टक्के अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.
जुलै महिन्यात तब्बल ८३.६३ इंच पाऊस बरसला, जो हवामान विभागाकडे असलेल्या मागील १२४ वर्षांच्या आकडेवारीच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस आहे.
७ जुलै रोजी तब्बल ९.२९ इंच पाऊस पडला जो एकाच दिवशी सर्वाधिक पाऊस पडलेल्या नोंदीत आतापर्यंतचा सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस
७ जुलै रोजी पणजीत तब्बल १४ इंच पावसाची नोंद झाली. हा पणजीत आतापर्यंत एकाच दिवशी पडलेला सर्वाधिक पाऊस आहे.
वाळपई, सांगे, साखळी, केपे, पेडणे येथे १५० इंचांहून अधिक पावसाची नोंद असून सर्वांत कमी ११७.९८ इंच पावसाची नोंद दाबोळी येथे केली आहे.
तीन महिन्यांत १५० इंच पाऊस पडण्याची ही पहिलीच घटना आहे. कदाचित यंदाचा पाऊस हा आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.