घटस्फोट झाल्यानंतर नवं नातं जुळवायचंय? 'या' 7 लक्षात ठेवाच

Sameer Amunekar

स्वतःला वेळ द्या

घटस्फोटानंतर लगेचच कोणत्याही नव्या नात्यात शिरणं टाळा. आधी मानसिक आणि भावनिक दृष्टिकोनातून स्वतःला सावरायला वेळ द्या.

Relationship Tips | Dainik Gomantak

जुन्या नात्याचा अनुभव

मागील नात्यात काय चुकलं, काय शिकता आलं याचा प्रामाणिक विचार करा. त्या चुका नवीन नात्यात टाळणं आवश्यक आहे.

Relationship Tips | Dainik Gomantak

सकारात्मक

नव्या नात्यात शिरण्याआधी तुम्ही भावनिकदृष्ट्या स्थिर आणि सकारात्मक असायला हवं. आधीच्या दुःखाचं ओझं घेऊन नवं नातं सुरू होऊ नये.

Relationship Tips | Dainik Gomantak

स्वतःची ओळख

तुमचं आयुष्य केवळ जोडीदाराभोवतीच फिरतंय का? की तुम्ही स्वतःचं स्वतंत्र आयुष्य जगू शकता? ही ओळख पक्की करा.

Relationship Tips | Dainik Gomantak

नवा जोडीदार

फक्त एकटेपणा भरून काढण्यासाठी कुणालाही स्वीकारू नका. जोडीदाराची विचारसरणी, स्वभाव आणि मूल्यं तपासून घ्या.

Relationship Tips | Dainik Gomantak

संवाद

नव्या नात्यात कोणत्याही गोष्टी लपवू नका. तुमच्या पूर्वीच्या नात्याबाबत प्रामाणिक राहा, संवाद हा विश्वासाचा पाया असतो.

Relationship Tips | Dainik Gomantak

नात्याची जबाबदारी

नवीन नात्याची जबाबदारी, अडथळे आणि गुंतवणूक यासाठी तुम्ही पूर्णतः तयार आहात का, हे स्वतःलाच विचारा.

Relationship Tips | Dainik Gomantak

नवीन घर घेताना 'या' गोष्टींची काळजी घ्या

Property Buying Guide | Dainik Gomantak
येथे क्लिक करा