Must Visit Places: नवीन वर्षाचे हटके सेलिब्रेशन करायचे आहे? मग द्या 'या' ठिकाणांना भेट

Sameer Panditrao

केरळची हाऊसबोटिंग

'देवभूमी' केरळमधील बॅकवॉटरवर हाऊसबोटिंगचा अनुभव घ्या. शांतता, सुंदर निसर्ग, आणि चविष्ट स्थानिक पदार्थ नवीन वर्षाची सुरुवात खास करतील.

Kerala Houseboating

जयपूर, राजस्थान

पिंक सिटी जयपूरमधील राजवाडे, किल्ले आणि सांस्कृतिक उत्सवांमुळे हा नवीन वर्ष साजरे करण्यासाठी एक खास ठिकाण बनते.

Jaipur

गोव्याचे समुद्रकिनारे

गोवा नवीन वर्ष साजरे करण्यासाठी एक परिपूर्ण स्थान आहे. समुद्रकिनाऱ्यावरील पार्ट्या, फटाके आणि संगीताचा आनंद घेत नवीन वर्षाचे स्वागत करा.

Goa

हिमाचल प्रदेश

हिमाचलचे बर्फाच्छादित डोंगर नवीन वर्षाच्या साजरे करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. सोलंग व्हॅली आणि मनाली येथे साहसी खेळ आणि बर्फाच्या दर्‍यांचा आनंद घ्या.

Himachal Pradesh

कच्छचे रण

कच्छच्या पांढऱ्या वाळवंटातील 'रण उत्सव' नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वोत्तम आहे. चंद्रप्रकाशातील वाळवंटाचा अद्भुत अनुभव घ्या.

Kutch Desert

वाराणसी

गंगा आरती, भव्य मंदिरं आणि अध्यात्मिक वातावरण नवीन वर्षाला एक वेगळ्या प्रकारे सुरुवात करण्यासाठी योग्य आहेत.

Varanasi

ताजमहाल, आग्रा (Taj Mahal, Agra)

प्रेमाचे प्रतीक ताजमहाल पाहण्यासाठी नवीन वर्ष अगदी योग्य आहे. इथला सुर्योदयाचा सुंदर नजारा अनुभवण्यासारखा आहे.

Taj Mahal
New Year Celebration साठी गोव्याला जाताय? मग घ्या 'ही' काळजी