Goa Beach: बुडणाऱ्या सूर्यासोबत किनाऱ्यावरची संध्याकाळ अनुभवली आहे का?

Akshata Chhatre

समुद्रकिनारा

वेगवेगळ्या परिस्थितीतून जाणाऱ्यांसाठी समुद्रकिनारा नेहमीच एकमेव पर्याय म्हणून समोर उभा राहतो. तुम्हाला कसली चिंता सतावत असेल किंवा कामाचा कंटाळा आला असेल तर समुद्र किनारी बसून शांतता मिळते.

भलीमोठी रांग

गोव्यात उत्तरेपासून ते दक्षिण टोकापर्यंत समुद्राची भलीमोठी रांग आहे आणि म्हणून इथे आल्याआल्या डोक्यावरचं ओझं कमी होतं.

रेतीतली अक्षरं

किनाऱ्यावर असलेल्या रेतीत एखादी चक्कर सुद्धा टाकली तरी अनेकवेळा मन शांत होतं. ओल्या रेतीत लिहिलेली अक्षरं समुद्र पुसून टाकतो आणि सोबतच आपले प्रश्न देखील संपल्यासारखं वाटतं.

रंगांच्या छटा

गोव्याला असाल तर किनाऱ्यावर जाऊन सूर्यास्त नक्की बघा कारण यावेळी समुद्रकिनारा वेगवेगळ्या रंगांच्या छटा निर्माण करतो.

लाटांचा आवाज

रात्रीच्यावेळी अनेकांना किनाऱ्यावर शांत बसायला आवडतं कारण केवळ लाटांचा आवाज सुद्धा तेव्हा पुरेसा असतो.

जन्नत

समुद्राचे असे अनेक गुण पहिले म्हणजे हे केवळ एक पर्यटनाचं ठिकाण नसून जन्नत असल्यागत वाटतं.

आणखीन बघा