Pramod Yadav
गोवा विधानसभेत अनुसूचित जमातींना राजकीय आरक्षण देण्याच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलीय. यावरुन भाजप श्रेय घेण्याचा तर अद्याप कायदा झाला नसल्याने काँग्रेस टीका करताना दिसेल.
मोपा विमानतळावर सातत्याने स्थलांतरित होणाऱ्या उड्डाणांमुळे दाबोळीच्या भवितव्याबाबत शंका व्यक्त केली जाते. दाबोळीवरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात टीका होण्याची शक्यता आहे.
म्हादई नदीचे पाणी काळसा भांडूरा प्रकल्पात वळविण्यावरुन कर्नाटक आणि गोवा यांच्यात सुरु असलेला वाद लोकसभेच्या रणधुमाळीत देखील पाहायला मिळेल.
गोव्याचा बेरोजगारीचा दर अधिक असल्याने यावरुन विरोधक सत्ताधारी भाजपला घेरण्याची शक्यता आहे. यासह महागाई आणि अपघात हे मुद्दे देखील चर्चेत राहतील.
गोव्यात मागील काळात घडलेल्या विविध धार्मिक तणावाच्या घटनांचा उल्लेख देखील प्रचारांमधून होण्याची शक्यता आहे.
गोव्यात घडणारे विविध गुन्हे यात प्रामुख्याने अमली पदार्थ, लैंगिक अत्याचाराच्या घटनांचे उल्लेख होण्याची शक्यता आहे.
गोव्यातील विविध भ्रष्टाचाराच्या विविध आरोपांवर भाष्य प्रचारातून होऊ शकते. विरोधक भाजप सरकारच्या विविध कथित घोटाळ्यांचा पाढा वाचू शकतात.