Pramod Yadav
गोव्याला बर्लिन येथे आयोजित पटवा ट्रॅव्हल कार्यक्रमात दोन पुरस्कार मिळाले आहेत.
गोवा सातत्याने राज्यात येणाऱ्या पर्यटकांना सुखद पर्यटन अनुभव देण्यासाठी प्रयत्न करत आहे.
गोव्याला ITB Berlin मध्ये डेस्टिनेशन ऑफ द ईयर पुरस्कार मिळाला आहे.
तर, राज्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे टुरिझम मिनिस्टर ऑफ द ईयर ठरले आहेत.
आयटीबी बर्लिन पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणारे राज्याचे पर्यटन खात्याचे सचिव संजीव आहुजा यांनी हा पुरस्कर स्विकारला.
निसर्गरम्य परिसर, नयनरम्य समुद्रकिनाऱ्यांमुळे गोवा नेहमीच देशी - विदेशी पर्यटकांसाठी खास आकर्षण राहिला आहे.
राज्यात नुकतेच रिजनरेटिव्ह पर्यटनाच्या दृष्टीने पाऊले टाकली जात आहे.