गोमन्तक डिजिटल टीम
सेंट फ्रान्सिस झेवियरच्या पवित्र अवशेषांचे दशवार्षिक प्रदर्शन गोव्यात सुरु होणार आहे.
गोव्यात दर दहा वर्षांनी त्यांचे अवशेष पाहण्यासाठी खुले करतात. त्यामुळे अनेक पर्यटक हे पाहण्यासाठी तेथे गर्दी करतात.
आता हे प्रदर्शन 21 नोव्हेंबर 2024 ते 5 जानेवारी 2025 या कालावधीत तुम्हाला पाहता येणार आहे. त्यासाठी तुम्ही गोव्यात येणार असाल तर नक्की या प्रदर्शनाला भेट देऊन पाहा.
गोव्यातील बॅसिलिका ऑफ बॉम जिझस' मध्ये सेंट फ्रान्सिस झेवियरच्या पवित्र अवशेषांचे जतन केले आहे.
प्रदर्शनादरम्यान राज्य तसेच विदेशातून अनेक पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. हे अवशेष पाहून त्यामागील इतिहास जाणून घेण्याचा पर्यटक प्रयत्न करतात.
यापूर्वी 2014-15 मध्ये जगप्रसिद्ध फान्सिस झेवियर यांचे अवशेष पाहण्यासाठी खुले करण्यात आले होते.
सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे 3 डिसेंबर 1552 रोजी चीनमधील शांगचुआन बेटावर निधन झाले होते.