ऑलिम्पिक, T20 विश्वचषकासह 2024 मध्ये होणार 'या' सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धा

Ashutosh Masgaunde

ऑलिम्पिक

ऑलिम्पिक ही या वर्षातील सर्वात मोठी स्पर्धा आहे. 26 जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधीत फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

Olympics 2024 | Twitter

यावर्षी क्रिकेटचे तीन विश्वचषक

या वर्षी 19 जानेवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान अंडर-19 विश्वचषक होणार आहे. . त्यानंतर 4 ते 30 जून दरम्यान टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे. तर, महिला टी-20 विश्वचषक वर्षाच्या अखेरीस बांगलादेशमध्ये होणार आहे.

Pat Cummins and Mitchell Starc | X

2024 मध्ये चार मोठ्या फुटबॉल स्पर्धा

वर्षाची सुरुवात आफ्रिकन कप ऑफ नेशन्सने होईल. ही स्पर्धा 13 जानेवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. त्याच वेळी, एएफसी आशियाई चषक 12 जानेवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान कतारमध्ये खेळवला जाईल.

Kylian Mbappe | Twitter

रोनाल्डोसाठी शेवटचा युरो कप?

युरो चषक 14 जून ते 14 जुलै दरम्यान जर्मनीमध्ये खेळवला जाईल. दरम्यान रोनाल्डो शेवटच्या वेळी पोर्तुगालच्या जर्सीमध्ये युरो कप खेळताना दिसू शकतो.

Cristiano Ronaldo | Twitter

कोपा अमेरिका

20 जूनपासून कोपा अमेरिका सुरू होणार आहे. लिओनेल मेस्सीचा संघ अर्जेंटिना गतविजेता म्हणून स्पर्धेत सहभागी होईल. त्यांची नजर जेतेपद कायम राखण्यावर असेल.

Argentina | Dainik Gomantak

चार ग्रँडस्लॅम स्पर्धा

वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा 14 ते 28 जानेवारी दरम्यान ऑस्ट्रेलियात खेळवली जाणार आहे. ऑस्ट्रेलियन ओपननंतर फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये फ्रेंच ओपनचे आयोजन करण्यात येणार आहे. फ्रेंच ओपन 20 मे ते 9 जून दरम्यान होणार आहे.

Rafael Nadal | Twitter

चार ग्रँडस्लॅम स्पर्धा

वर्षातील तिसरी ग्रँडस्लॅम म्हणजे विम्बल्डन. 1 ते 14 जुलै दरम्यान लंडनमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. त्याच वेळी, वर्षातील शेवटचे ग्रँडस्लॅम यूएस ओपन 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान होणार आहे.

Wimbledon | Dainik Gomantak

अश्विन नंबर वन! कसोटीत 2023 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे 5 भारतीय

R Ashwin | Dainik Gomantak
अधिक पाहाण्यासाठी...