अश्विन नंबर वन! कसोटीत 2023 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे 5 भारतीय

Pranali Kodre

2023

भारतीय क्रिकेट संघाने 2023 मधील सर्व सामने खेळून झाले असून भारताने यावर्षात 8 कसोटी सामने खेळले. भारताने 3 सामने जिंकले आणि 3 सामने पराभूत झाले. तसेच 2 सामने अनिर्णित राहिले.

सर्वाधिक विकेट्स

यावर्षी कसोटीत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये केवळ चारच गोलंदाजांना 10 पेक्षा अधिक विकेट्स घेता आल्या आहेत. 2023 मध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या 5 खेळाडूंबद्दल जाणून घेऊ.

आर अश्विन

आर अश्विनने 2023 वर्षात 7 कसोटी सामन्यातील 13 डावात गोलंदाजी करताना 17.02 च्या सरासरी 41 विकेट्स घेतल्या.

रविंद्र जडेजा

अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने 2023 मध्ये 7 सामन्यांतील 14 डावात गोलंदाजी करताना 19.39 च्या सरासरीने 33 विकेट्स घेतल्या.

Ravindra Jadeja

मोहम्मद सिराज

मोहम्मद सिराजने 2023 वर्षात 7 कसोटी सामन्यांतील 11 डावात गोलंदाजी करताना 31.80 च्या सरासरीने 15 विकेट्स घेतल्या.

Mohammed Siraj

मोहम्मद शमी

मोहम्मद शमीने 2023 वर्षात 4 कसोटी सामन्यांतील 8 डावात गोलंदाजी करताना 31.92 च्या सरासरीने 13 विकेट्स घेतल्या.

Mohammad Shami | X/ICC

उमेश यादव

उमेश यादवने 2023 वर्षात 3 कसोटी सामन्यांतील 6 डावात 55.80 च्या सरासरीने 5 विकेट्स घेतल्या.

Umesh Yadav | X/BCCI

विराट ते अक्षर, कसोटीत 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणारे 5 भारतीय

Virat Kohli - Ravindra Jadeja | Twitter