Sameer Amunekar
स्पायडर प्लांट हे घरातील हवा शुद्ध करणाऱ्या सर्वोत्तम वनस्पतींपैकी एक आहे. हे प्लांट हानिकारक रसायने जसे की फॉर्मल्डिहाइड, कार्बन मोनोक्साइड, बेंझीन शोषून घेतात.
स्पायडर प्लांट दिवस व रात्री दोन्ही वेळा थोड्या प्रमाणात ऑक्सिजन निर्माण करतो, त्यामुळे घरातील ऑक्सिजनचे प्रमाण संतुलित राहते.
धूळ, धुराचे कण आणि सूक्ष्म जंतू यांना शोषून घेण्याची क्षमता असल्याने श्वसनास त्रास असलेल्या व्यक्तींसाठी उपयुक्त आहे.
स्पायडर प्लांटची निगा राखणे अतिशय सोपी आहे. कमी पाणी आणि अप्रत्यक्ष सूर्यप्रकाशातही ते सहज वाढते.
हिरवळ आपल्या मनावर शांत आणि सकारात्मक परिणाम करते. स्पायडर प्लांट घरात असणे मानसिक तणाव कमी करण्यास मदत करते.
स्पायडर प्लांटच्या हिरव्या-धारीदार पानांनी घराचा कोपरा सुंदर आणि फ्रेश दिसतो. कोणत्याही खोलीत नैसर्गिक आकर्षण वाढवतो.