Sameer Amunekar
वयानुसार होणाऱ्या 'फोटोएजिंग' (Photoaging) पासून वाचण्यासाठी सनस्क्रीन अनिवार्य आहे. घराबाहेर पडतानाच नाही, तर घरात असतानाही किमान SPF 30 चे सनस्क्रीन लावा.
फक्त एकदा चेहरा धुणे पुरेसे नसते. दिवसाभरातील प्रदूषण, घाम आणि मेकअप काढण्यासाठी आधी ऑईल-बेस्ड क्लींजर आणि नंतर वॉटर-बेस्ड फेस वॉश वापरा. यामुळे छिद्रे खोलवर स्वच्छ होतात.
तिशीनंतर त्वचा कोरडी पडू लागते. त्यामुळे दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी प्या. तसेच त्वचेवर हायल्युरोनिक ॲसिड (Hyaluronic Acid) असलेले सीरम किंवा मॉइश्चरायझर वापरा, जे त्वचेचा ओलावा टिकवून ठेवते.
त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून वाचवण्यासाठी व्हिटॅमिन-सी (Vitamin C) सीरमचा वापर करा. हे त्वचेचा पोत सुधारते आणि डार्क स्पॉट्स कमी करून चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणते.
चेहऱ्यावर वयाच्या खुणा सर्वात आधी डोळ्यांभोवती दिसतात. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी 'अंडर आय क्रीम' लावण्यास सुरुवात करा. यामुळे डार्क सर्कल्स आणि फाईन लाईन्स कमी होतात.
झोपेच्या वेळी त्वचा स्वतःची दुरुस्ती करत असते. अपुऱ्या झोपेमुळे 'कोर्टिसोल' हार्मोन वाढतो, ज्यामुळे त्वचा निस्तेज दिसते. त्यामुळे दररोज किमान ७-८ तासांची गाढ झोप घेणे आवश्यक आहे.
बाहेरून लावल्या जाणाऱ्या उत्पादनांइतकाच तुमचा आहारही महत्त्वाचा आहे. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड्सचा समावेश करा.