Manish Jadhav
गोवा म्हटलं आपल्या डोळ्यासमोर लगेच इथला निळाशार समुद्रकिनारा, धबधबे, अभयारण्ये येतात. पण तुम्ही गोव्याला भेट देत असाल तर इथले 'ट्रॉपिकल स्पाइस' फार्म नक्की पाहिला पाहिजे.
'ट्रॉपिकल स्पाइस' हे गोव्यातील प्रसिद्ध मसाल्यांच्या लागवडींपैकी एक फार्म आहे.
फोंडा तालुक्यातील केरी येथे हा ट्रॉपिकल स्पाइस फार्म आहे. याठिकाणी पर्यटकांचे स्वागत हर्बल चहाने केले जाते.
तुम्ही येथील देशी मसाले देखील खरेदी करु शकता.
फोंड्यातील केरी मध्ये स्थित असलेले ट्रॉपिकल स्पाईस प्लांटेशन हा एक अनोखा अनुभव आहे. तुम्ही गोव्यात नक्की याचा अनुभव घ्या.
फोंडापासून 6 किमी अंतरावर ट्रॉपिकल स्पाईस प्लांटेशन आहे. हे ट्रॉपिकल स्पाइस गोव्यातील सर्वात जुन्या मसाल्यांच्या लागवडींपैकी एक आहे.
केरी गावात ताजेतवाने व स्वच्छ वातावरण असून या प्रसिद्ध मसाल्याच्या बागांना भेट देताना तुम्हाला तेच मिळते. जर तुम्ही निसर्ग प्रेमी असाल, तर ट्रॉपिकल स्पाईस प्लांटेशनला नक्की भेट द्या.