Sameer Panditrao
पुढील दहा वर्षांत चंद्रावर स्वयंपूर्ण शहर उभारण्याचे ‘स्पेसएक्स’चे उद्दिष्ट असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एलॉन मस्क यांनी जाहीर केले आहे.
‘स्पेसएक्स’ने आता चंद्रावर स्वयंपूर्ण शहर उभारण्याचा निर्धार बोलून दाखविला.
मस्क यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी, ‘स्पेसएक्स’ने आता चंद्रावर स्वयंपूर्ण शहर उभारण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
मंगळावर शहर उभारण्याचे प्रयत्नही ‘स्पेसएक्स’कडून केले जाणार असून त्याचे काम साधारण पाच ते सात वर्षांत सुरू होईल.
मानवी संस्कृतीचे भविष्य सुरक्षित करण्यास आणि चंद्रावर लवकरात लवकर पोहचण्यास आमचे प्राधान्य आहे,’ असे मस्क यांनी नमूद केले.
चंद्रावर अंतराळवीर पाठवण्यासाठी सध्या अमेरिका आणि चीनमध्ये मोठी स्पर्धा सुरू आहे. १९७२ मधील ‘अपोलो’ मोहिमेनंतर मानव चंद्रावर उतरलेला नाही.
मानवाला बहुग्रहीय बनविण्याच्या संकल्पनेसाठी मस्क गेल्या अनेक वर्षांपासून आग्रही असून, मंगळ हे त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट राहिले आहे.