Sameer Panditrao
गेल्या २० वर्षांपेक्षा अधिक काळ निद्रिस्त राहिल्यानंतर अंदमान व निकोबार बेटांवरील बारातांग येथील देशातील एकमेव चिखलाच्या ज्वालामुखीचा पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे.
येथील चिखलाचा ज्वालामुखी भूगर्भात सेंद्रिय पदार्थ कुजल्यामुळे निर्माण होणाऱ्या वायूतून तयार झाला आहे.
ज्वालामुखीतून चिखल व वायू बाहेर पडून बुडबुडे व खड्डे तयार होतात.
हा भारतातील चिखलाचा एकमेव ज्वालामुखी असून अंदमान निकोबार बेटांना भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी विशेष आकर्षण मानला जातो.
अशा प्रकारचा मोठा उद्रेक यापूर्वी २००५ मध्ये झाला होता. उद्रेकानंतर एखाद्या स्फोटाप्रमाणे कानठळ्या बसणारे आवाज ऐकायला मिळाले.
ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे मातीचा ३-४ मीटर उंचीचा ढिगारा तयार झाला असून एक हजार चौ. मीटरपेक्षा अधिक परिसरात चिखल, माती पसरली आहे.
अजूनही हा उद्रेक सुरू असून ज्वालामुखीतून सातत्याने चिखल व धूर बाहेर पडत आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून पर्यटकांना ज्वालामुखीकडे जाण्यास बंदी करण्यात आली आहे.