Goa, Rachol Fort: गोव्यातील 'राशोल' किल्ला देतो ऐतिहासिक वारशाची साक्ष्य

Manish Jadhav

गोवा

गोव्याला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गोव्यातील किल्ले आजही या ऐतिहासिक वारशाची साक्ष्य देतात.

Goa, Rachol Fort | Dainik Gomantak

गोव्यातील किल्ले

गोव्यात अनेक प्रसिद्ध असे किल्ले आहेत. आज आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून राशोलच्या किल्ल्याविषयी जाणून घेणार आहोत...

Goa, Rachol Fort | Dainik Gomantak

राशोल किल्ला (Rachol Fort)

दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुक्यात मडगावच्या ईशान्येस साधारण 5 कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे.

Goa, Rachol Fort | Dainik Gomantak

अवशेष

आता या किल्ल्याचे काही थोडेफार अवशेष शिल्लक आहेत. त्यामध्ये किल्ल्याचे प्रवेशद्वार आणि खंदक आपल्याला दिसतात. किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आपला राशोल गावात प्रवेश होतो.

Goa, Rachol Fort | Dainik Gomantak

कधी किल्ला बांधला!

मुस्लीम बहामनी साम्राज्यात हा किल्ला बांधण्यात आला. पुढे हा किल्ला आदिलशहाकडे गेला.

Goa, Rachol Fort | Dainik Gomantak

पोर्तुगिजांचा ताबा

राजा कृष्णदेवराय याने आदिलशहाकडून तो आपल्या ताब्यात घेतला. पुढे तो पोर्तुगीजांकडे आला. नंतर तो शेवटपर्यंत पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिला.

Goa, Rachol Fort | Dainik Gomantak

तुम्ही नक्की भेट दिली पाहिजे?

तुम्ही गोवा ट्रीप प्लॅन करत असाल तर नक्की राशोल किल्ला पाहिला पाहिजे.

Goa, Rachol Fort | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी