द.आफ्रिका - भारत दुसऱ्या कसोटीत पावसाचा अडथळा?

Pranali Kodre

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना आणि निर्णायक सामना 3 ते 7 जानेवारी 2023 दरम्यान खेळला जाणार आहे.

Rohit Sharma - Kagiso Rabada | AFP

केपटाऊन कसोटी

हा सामना केपटाऊनमधील न्यूलँड्स स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान, या मालिकेतील पहिल्या सामन्यावेळी पावसाचा अडथळा आला, तसा दुसऱ्या सामन्यातही येणार का, असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

Team India | PTI

पहिले तीन दिवस

दरम्यान,Accuweather च्या रिपोर्टनुसार केपटाऊनमध्ये 3, 4 आणि 5 जानेवारी दरम्यान म्हणजेच सामन्याच्या पहिल्या तीन दिवशी पावसाची अजिबात शक्यता नाही.

South Africa | PTI

हवामान

पहिल्या दोन्ही दिवशी उष्ण वातावरण असू शकेल, तसेच तिसऱ्या दिवशी ढगाळ आणि काहीसे थंड वातारवरण असेल.

Prasidh Krishna - KL | PTI

चौथा दिवस

याशिवाय 6 जानेवारीला 60 टक्क्याहून अधिक पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या सामन्यात चौथ्या दिवशी पावसाचा अडथळा येऊ शकतो.

Shubman Gill | PTI

पाचवा दिवस

तसेच 7 जानेवारीला सूर्याचेही दर्शन होईल, तर काहीप्रमाणात ढगाळ वातावरणही असेल. तसेच पावसाची शक्यता नाही.

South Africa | PTI

अंदाज

एकूण हवामानाचा अंदाज पाहाता सामना पूर्ण होण्याची शक्यता आहे, केवळ चौथ्या दिवशी पावसाचा अडथळा येण्याची शक्यता आहे.

South Africa | PTI

मालिका वाचवण्याचे भारतासमोर आव्हान

दरम्यान, पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला असल्याने ते मालिकेत 1-0 ने पुढे आहेत. त्याचमुळे मालिका वाचवण्यासाठी भारताला विजय आवश्यक आहे. जर सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला किंवा अनिर्णित राहिला, तर मालिकाही दक्षिण आफ्रिका जिंकेल.

Rohit Sharma | PTI

वॉर्नरच्या शेवटच्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग-11 जाहीर

David Warner | X/cricketcomau
आणखी बघण्यासाठी