Pranali Kodre
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघातील कसोटी मालिकेचा तिसरा आणि अखेरचा सामना 3 ते 7 जानेवारी 2024 दरम्यान सिडनीला खेळवला जाणार आहे.
हा सामना दिग्गज सलामीवर डेव्हिड वॉर्नरचा अखेरचा कसोटी सामना आहे.
वॉर्नरने यापूर्वीच घोषित केले होते की तो पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर कसोटीतून निवृत्त होणार आहे.
दरम्यान, वॉर्नरला सिडनी कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक दिवस आधीच या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे.
या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध मेलबर्नला झालेल्या दुसऱ्या कसोटीत खेळलेला 11 जणांचा संघच कायम करण्यात आला आहे.
त्यामुळे फलंदाजांमध्ये वॉर्नरसह उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड हे कायम असतील, तर अष्टपैलू मिचेल मार्श आणि यष्टीरक्षक ऍलक्स कॅरेही संघात आहेत.
गोलंदाजी फळीत कर्णधार पॅट कमिन्ससह मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेजलवूड संघात आहेत.
डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड, मिचेल मार्श, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), नॅथन लायन, जोश हेझलवूड.