Pranali Kodre
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात 17 डिसेंबर 2023 पासून 3 सामन्यांची वनडे मालिका सुरु झाली असून पहिला सामना जोहान्सबर्गमधील न्यू वाँडरर्स स्टेडियममध्ये खेळवण्यात आला.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ गुलाबी जर्सी घालून मैदानात उतरला होता.
यामागील कारण म्हणजे ब्रेस्ट कँन्सरबद्दल (स्तनाचा कर्करोग) जागरुकता पसरवण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघाने गुलाबी रंगाची जर्सी घातली.
दरम्यान, गेली अनेक वर्षे दक्षिण आफ्रिका ही परंपरा पाळत आहे.
ज्यादिवशी दक्षिण आफ्रिका वनडेत गुलाबी रंगाची जर्सी परिधान करतात, त्यावेळी दक्षिण आफ्रिकेत सामना पाहायला येणारे बरेचसे प्रेक्षकही गुलाबी रंगाचा वेश परिधान करतात.
या सामन्यातून मिळणारा पैसा ब्रेस्ट कँन्सरसाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांसाठी वापरला जातो.
दरम्यान, आत्तापर्यंत दक्षिण आफ्रिकेने १२ वनडे सामने ब्रेस्ट कँन्सरच्या जागृतीसाठी गुलाबी रंगाच्या जर्सीत खेळले आहेत.