Pranali Kodre
बंगळुरुमध्ये 17 जानेवारी 2024 रोजी भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात टी20 सामना पार पडला.
या सामन्यात रोहित शर्माने 69 चेंडूत 11 चौकार आणि 8 षटकारांसह 121 धावांची नाबाद खेळी केली.
रोहितचे हे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील पाचवे शतक आहे.
रोहित आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 5 शतके करणारा पहिला खेळाडू ठरला असून त्याने ग्लेन मॅक्सवेल आणि सूर्यकुमार यादवला मागे टाकले आहे.
ग्लेन मॅक्सवेल आणि सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये प्रत्येकी 4 शतके केली आहेत.
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये रोहित, मॅक्सवेल आणि सूर्यकुमार यांच्या पाठोपाठ बाबर आझम, सबावून डाविझी आणि कॉनिल मुनरो संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
बाबर आझम, सबावून डाविझी आणि कॉनिल मुनरो यांनी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये प्रत्येक 3 शतके केली आहेत.