Manish Jadhav
आगामी रेसिंग स्पर्धेसाठी सराव करताना दाक्षिणात्य सुपरस्टार अजित कुमार यांचा पुन्हा एकदा कार अपघात झाला.
हा अपघात हाय स्पीड सराव सत्रादरम्यान झाला, ज्यामध्ये त्यांच्या कारचे बरेच नुकसान झाले. सुदैवाने ते थोडक्यात बचावले.
एस्टोरिल येथे होणाऱ्या एका मोठ्या मोटरस्पोर्ट्स रेसिंग स्पर्धेपूर्वी अजित कुमार पोर्तुगालमध्ये होते. तिथेच त्यांचा प्रशिक्षणादरम्यान अपघात झाला.
या अपघातानंतर अजित कुमार यांनी एका मुलाखतीदरम्यान घटनेबद्दल सविस्तर सांगितले. हा एक छोटासा अपघात असल्याचे त्यांनी म्हटले.
अजित कुमार कदाचित याला किरकोळ अपघात म्हणत असतील पण एक महिन्यापूर्वीही ते अशाच प्रकारे अपघाताचे शिकार ठरले होते.
8 जानेवारीच्या सुमारास अजित कुमार आगामी रेस चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्यासाठी दुबईला गेले होते. तिथेच ते अपघाताचे शिकार ठरले होते. विशेष म्हणजे, अपघाताच्या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्यांची कार ट्रॅक सेफ्टी बॅरियरला धडकल्याचे स्पष्टपणे दिसत होती.